Roshan More
अंजू शर्मा या वयाच्या 22 वर्षी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी पास होत IAS बनल्या.
गुजरातमधील राजकोट येथे अंजू यांनी असिस्टंट कलेक्टर म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्या आता उच्च शिक्षण विभागाच्या मुख्य सचिव आहेत.
अंजू शर्मा या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत नापास झाल्या होत्या.
अंजू या बारावीला देखील नापास झाल्या होत्या. अर्थशास्त्र विषयात त्या नापास झाल्या होत्या. मात्र, बाकी सर्व विषयात चांगले मार्क होते.
अंजू या जेव्हा नापास झाल्या तो काळ त्यांच्यासाठी खूप कठीण होता. मात्र, त्यांच्या आईने त्यांना साथ दिली. त्यामुळे त्या यश मिळवू शकल्या.
अंजू यांनी राजस्थानमधून आपले उच्च शिक्षण घेतले. त्यांनी बीएस्सी आणि एमबीए केले.
10 वी, 12 वीला अपयश मिळाल्यानंतर यूपीएससीची तयारी करताना शेवटच्या क्षणी अभ्यास न करता रणनीती आखून अभ्यास केला.