सरकारनामा ब्यूरो
दरवर्षी लाखो विद्यार्था यूपीएससी परीक्षा पास होण्याच स्वप्न पाहतात, परंतु केवळ काहीच यशस्वी होतात. त्यातीलच एक आहेत अंकिता जैन.
यूपीएससीत 3 रा रँक
UPSC परीक्षेला बसण्यासाठी चांगली नोकरी सोडली.आणि UPSC ची तयारी करत परीक्षेत 3रा रँक मिळवला.
त्या मूळच्या आग्रा येथील असून त्यांनी दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटीमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.एस्सी. टेक केले आहे.
अंकिता जैनची बहीण वैशाली जैन या देखील एक IAS अधिकारी आहेत.
त्यांना पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नाही, आणि दुसऱ्या प्रयत्नात अपेक्षित रँक मिळाले नाही. तरीही न हार मानली नाही. प्रयत्न सुरु ठेवले.
चौथ्या प्रयत्नात अंकिताला यश मिळाले. 2016 च्या परीक्षेत टॉपर. तर 2020 च्या परीक्षेत त्यांना 3 रा क्रमांक मिळाला.
अंकिता जैन या गोंडा येथे सह दंडाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.