सरकारनामा ब्यूरो
अशा अनेक महिला आहेत ज्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडत आपली स्वप्ने पूर्ण करतात त्यातीलच एक नाव शिप्रा पांडे.
शिप्राने त्यांच्या लहान मुलाला सांभाळत यूपीएसची तयारी केली आणि परीक्षेत टॉप रँक मिळवून अव्वल स्थान पटकावले.
उत्तर प्रदेशामधील बस्ती जिल्ह्यातील त्या रहिवासी असून शिप्रा यांचे शिक्षण त्याच जिल्ह्यात झाले.
शिप्रा यांनी फिजिक्समध्ये पदवी मिळवली. पदवीनंतर त्यांनी नॅनोटेक्नॉलॉजीमध्ये पीएचडी पूर्ण केली. परंतू त्याच दरम्यान त्याचे लग्न झाले.
पीएचडीनंतर शिप्रा यांना परदेशातून नोकरीसाठी अनेक ऑफर आल्या, मात्र त्यांनी त्या स्वीकारल्या नाहीत आणि यूपीएससीची तयारी सुरु केली.
याचदरम्यान त्यांनी मुलाला जन्म दिला. लहान मुलाची काळजी घेत त्यांनी यूपीएससीची तयारी सुरु ठेवली.
परीक्षेत त्यांना दोनदा अपयश आले. मात्र हार न मानता तिसऱ्या प्रयत्नात त्या यशस्वी झाल्या.
सध्या त्या लखनऊ येथे कार्यरत आहेत.