सरकारनामा ब्यूरो
जिद्दी आणि चिकाटी असेल तर अविश्वसनीय गोष्टी देखील मिळू शकतात. हेच दाखवून दिलं दृष्टीहीन अंकुरजीत सिंग यांनी. अंकुरजीत सिंग यांनी सर्वात कठीण यूपीएससीची परीक्षा 2017 साली पास झाले आहेत.
2011 बॅचेच अंकुरजीत सिंग यांनी परीक्षेत 414 वा क्रमांक मिळवून आयएएस अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण केले.
अंकुरजीत सिंह हे शालेय वयात असतानाच त्यांच्या डोळ्याला अंधारी येत त्यांची दृष्टी कमी झाली आणि नंतर ते संपूर्णपणे अंधत्व आले.
अंकुरजीतची जिद्द आणि मेहनती बघून त्यांच्या शिक्षकांनी त्यांना प्रोत्साहन दिले. बारावीनंतर एका शिक्षकाने त्यांना आयआयटीची परीक्षा देण्यासाठी सांगितले. अंकुरजीतने हे आव्हान स्वीकारत आयआयटीमध्ये प्रवेश मिळवला.
स्क्रीन रीडरसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेऊन त्यांच्या मदतीने यूपीएससीची तयारी सुरू केली. UPSC परीक्षा देत 2017 मध्ये 414 वा क्रमांक मिळवत त्यांनी IAS होण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण केले.
आपले कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाने अंधत्व असताना देखील अंकुरजीत यांनी जिद्दच्या बळावर यश मिळवले.
अंकुरजीत यांची जालंधर येथे विकास प्राधिकरणाचे मुख्य प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.