Mangesh Mahale
तानाजी सावंत हे सर्वांत श्रीमंत मंत्री आहे. त्यांची संपत्ती २१८.१ कोटी रुपये इतकी आहे.
मंगलप्रभात लोढा यांच्या संपत्तीत पाच वर्षांत घट झाली असली, तरी ते दुसऱ्या स्थानी आहेत.त्यांची संपती १४०.८ कोटी रुपये आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपत्तीत ६६ टक्के वाढ झाली आहे. त्यांची संपत्ती १३ कोटी झाली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपत्तीत ५६ टक्के वाढ झाली आहे. त्यांची संपत्ती १२.६ कोटी इतकी आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपत्तीत ४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यांची संपत्ती १०३.३ कोटी इतकी आहे.
छगन भुजबळ यांच्या संपत्तीत १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ३०.९ कोटी इतकी आहे.
हसन मुश्रीफ यांची संपत्ती पाच वर्षात ३४ टक्क्यांनी वाढली असून ती १२.९ कोटी आहे.
धनंजय मुंडे यांच्या संपत्तीत पाच वर्षांत ८१ टक्के वाढ झाली असून त्यांची संपत्ती ४८.३ कोटी रुपये आहे.
अदिती तटकरे त्यांच्या निव्वळ संपत्तीत पाच वर्षांत वाढ झाल्याचे दिसते. त्यांची संपत्ती ३.४१ कोटी रुपये आहे.