Jagdish Patil
यूपीएससी परीक्षा खूपच कठीण असते. या परीक्षेत पास होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.
मात्र, काही हुशार विद्यार्थी असे असतात की ते ही अवघड परीक्षा एकदा नव्हे तर दोनदा क्रॅक करतात.
IAS अर्पिता थुबे या देखील अशाच हुशार विद्यार्थी होत्या ज्यांनी यूपीएससीत दोनदा यश मिळवलं आहे.
यश एका रात्रीत मिळत नाही म्हणतात, पण जर तुमचा दृढनिश्चय असेल तर कठीणातील कठीण ध्येय देखील तुम्ही साध्य करू शकता.
असंच कठीण आणि अवघड ध्येय अर्पिता थुबे यांनी आपल्या कष्टाच्या आणि अभ्यासाच्या जोरावर मिळवलं आहे.
IAS अर्पिता थुबेंनी 2022 साली 214 रँकने यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्या 'ब्युटी विथ ब्रेन'चं उत्तम उदाहरण आहेत.
त्यांनी एकदा नाही तर दोनदा UPSC परीक्षा क्रॅक केली आहे. 2020 च्या UPSC परीक्षेत तिने 383 वा क्रमांक मिळवला आणि त्यांना IPS केडर देण्यात आला.
मात्र, आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी 2022 मध्ये पुन्हा एकदा यूपीएससी परीक्षा दिली आणि त्या IAS अधिकारी बनल्या.
अर्पिता यांनी सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलं आहे.
त्या सोशल मीडियावरही खूप फेमस असून त्यांचे इंस्टाग्रामवर 96 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.