सरकारनामा ब्यूरो
अरुणा सुंदरराजन या भारताच्या दूरसंचार सचिव आणि प्रशासकीय सेवेतील सर्वात वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांपैकी एक आहेत.
केरळ केडरच्या अरुणा या 1982 च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत.
केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक विभागात जबाबदाऱ्या सांभाळण्याचा त्यांना तीन दशकांहून अधिक अनुभव आहे.
आर्थिक अन् विकास प्रशासन तसेच गुंतवणूक प्रोत्साहन आणि IT टेलिकॉम डोमेनमध्ये त्यांनी नेतृत्व केले आहे.
मंत्रालयाच्या सचिव म्हणून नोटाबंदीनंतरच्या टप्प्यात डिजिटल इंडिया उपक्रमांना चालना देण्यामागे त्यांची महत्त्वाची भूमिका होती
भारतात ई-गव्हर्नन्स वाढवण्यासाठी, मनुष्यबळ आणि नवकल्पना विकास यांचा समावेश केला.
डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायतींना जोडण्यासाठी मोठ्या पायाभूत सुविधा तसेच ग्रामीण हाय-स्पीड ब्रॉडबँड प्रकल्प त्यांनी राबवले.
'अक्षया' संकल्पनेद्वारे केरळमधल्या दहा लाखांहून अधिक लोकांना त्यांच्या नेतृत्वाखाली
मूलभूत डिजिटल कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले.
पोलाद मंत्रालयाच्या सचिव आणि प्रतिष्ठित कॉमन सर्व्हिस सेंटर प्रोजेक्टच्या सीईओसह अनेक महत्त्वाच्या पदांवरही त्यांनी काम केले आहे.
R