सरकारनामा ब्यूरो
एम. सी. छागला राजकारणी आणि सरकारी अधिकारी होते.
ते एक प्रतिष्ठित उदारमतवादी वकील तसेच न्यायाधीशही होते.
स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले.
हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची तीन वर्षांची कारकीर्द विशेष गाजली. अनेक प्रकरणांत त्यांनी दिलेल्या निर्णयाचे जगभरात कौतुक झाले.
छागला हे युनायटेड स्टेट्स, मेक्सिको, आयर्लंड आणि क्युबा या देशांचे राजदूत होते.
ब्रिटनचे उच्चायुक्त म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली.
काश्मीर वादविवाद दरम्यान ते संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेते आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री झाले.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी समर्पण आणि आपल्या क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी त्यांना 'युनेस्को'चा पुरस्कार मिळाला आहे.
R