Jagdish Patil
आपल्या 34 वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल 57 वेळा बदली झालेले हरियाणातील IAS अधिकारी अशोक खेमका आज (ता.30) सेवानिवृत्त होत आहेत.
प्रामाणिक IAS अशी ओळख असलेल्या खेमका यांची प्रामाणिकपणामुळेच सतत बदली होत राहिली आणि यामुळेच बदली होणारे IAS अशीच पुढे त्यांची ओळख बनली.
काँग्रेस नेते आणि सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्याशी संबंधित वादग्रस्त गुरुग्राम येथील जमीन व्यवहाराचा पर्दाफाश केल्यानंतर ते देशभरात चर्चेत आले.
1991 च्या बॅचचे IAS असलेले खेमका परिवहन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावरून आज सेवानिवृत्त होतील. डिसेंबर 2024 मध्ये त्यांची या पदावर नियुक्ती झाली होती.
कोलकाता येथे जन्मलेल्या अशोक खेमका यांनी शालेय शिक्षणानंतर IIT खरगपूर येथून कंप्यूटर इंजिनिअरिंगची पदवी घेतली.
त्यानंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमधून संगणक विज्ञानात PHD केली.
प्रशासकीय सेवेत असतानाच त्यांनी पंजाब विद्यापीठातून LLB पूर्ण केलं. मनोहर लाल खट्टर सरकारने परिवहन विभागातून त्यांची बदली केली.
त्यानंतर अवघ्या 4 महिन्यांतच त्यांची पुन्हा बदली करण्यात आली. तर पुन्हा तब्बल दहा वर्षांनी पुन्हा त्यांची या परिवहन विभागात नियुक्ती करण्यात आली.