Jagdish Patil
भारताच्या सर्वोच्च सुरक्षा दलांमध्ये NSG हे नाव सर्वात आधी घेतलं जातं. भारताच्या NSG प्रमाणेच पाकिस्तानकडेही SSG कमांडो आहेत.
22 एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांपैकी एक पाकिस्तानच्या SSG चा माजी कमांडो होता.
तर पाकिस्तानचे SSG कमांडो भारताच्या एनएसजीपेक्षा किती वेगळे असतात, ते जाणून घेऊया.
एसएसजी स्थापना 1956 मध्ये करण्यात आली. ही पाकिस्तानी सैन्याची एक मजबूत शाखा आहे.
SSG कमांडो आधुनिक शस्त्रे वापरण्यात आणि लढण्यात पारंगत आहेत. त्यांना 9 महिन्यांचं खूप कठीण प्रशिक्षण दिलं जातं.
प्रशिक्षणानंतर त्यांना गोरिल्ला युद्ध आणि गुप्तचर ऑपरेशन्ससह विविध मोहिमांमध्ये पाठवलं जातं.
SSG प्रशिक्षणात ज्युडो, कराटे, लष्करी नेव्हिगेशन, रासायनिक स्फोटके हाताळणे आणि निकामी करणे यांचा समावेश आहे.