Roshan More
केरळमधील बी अब्दुल नासर हे पाच वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले.
अब्दुल नासर यांच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. त्यांची आईने अब्दुल यांना अनाथालय टाकले. तेथे अब्दुल 13 वर्ष होते.
अब्दुल यांनी स्वच्छता कर्मचारी तसेच पेपर वाटणे,टेलिफोन ऑपरेटर या सारखी छोटी छोटी कामे करून आपले शिक्षण पूर्ण केले.
अब्दुल यांनी थलासेरीमधील सरकारी काॅलेजमधून आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
पोस्ट ग्रज्युएशन पूर्ण केल्यानंतर अब्दुल यांना केरळच्या आरोग्य विभागात नोकरी मिळाली.
2006 मध्ये खातेअंतर्गत प्रोमशन मिळत अब्दुल यांना उपजिल्हाधिकारी पद मिळाले.
अब्दुल यांचे लहानपण अनाथालयात गेले होते. त्यामुळे समाजासाठी काम करण्याची त्यांची इच्छा होती. 2015 मध्ये अब्दुल हे राज्यातील सर्वोत्कृष्ट उपजिल्हाधिकारी होते.
2017 मध्ये अब्दुल यांना प्रोमोशन मिळाले आणि ते IAS झाले. 2019 मध्ये ते कोल्लम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते.