IAS B Chandrakala: 'ऑन दि स्पॉट' फैसला अन् आलीच वेळ तर राजकीय नेत्यांशीही पंगा घेणाऱ्या 'आयएएस' अधिकारी

Deepak Kulkarni

आयएएस अधिकारी

बी. चंद्रकला या एक आयएएस अधिकारी आहे. त्या त्यांच्या धडाकेबाज निर्णय आणि बेधडक कारवाईसाठी ओळखल्या जातात.

IAS B.Chandrakala | Sarkarnama

आंध्र प्रदेशातला जन्म..

चंद्रकला यांचा जन्म आंध्र प्रदेशातील गर्जनपल्ली येथे झाला. त्या 'ऑन दि स्पॉट' निर्णय आणि वेळप्रसंगी राजकीय नेत्यांसोबतही त्या पंगा घेण्यासही कधी डगमगत नाही.

IAS B.Chandrakala | Sarkarnama

कौटुंबिक पार्श्वभूमी...

बारावीपर्यंत त्यांनी गावी असलेल्या केंद्रीय विद्यालयात शिक्षण घेतले. तिचे वडील बी किशन हे एका सरकारी खत कंपनीत वरिष्ठ तंत्रज्ञ होते, तर आई लक्ष्मी उद्योजिका आहे.

IAS B.Chandrakala | Sarkarnama

शिक्षण...

हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून बी चंद्रकला यांनी भूगोल विषयात पदवी आणि अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे.

IAS B.Chandrakala | Sarkarnama

यूपीएससीसाठी मिळाला आत्मविश्वास

आंध्र प्रदेश राज्य पीएससीने घेतलेल्या आंध्र प्रदेश गट १ च्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यानंतर, तिला सहकारी संस्थांचे उपनिबंधक म्हणून नियुक्त करण्यात आले. यामुळे तिला यूपीएससी परीक्षेला सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वास मिळाला .

IAS B.Chandrakala | Sarkarnama

2007 मध्ये त्या आयएएस परीक्षा उत्तीर्ण

चंद्रकला यांना UPSC परीक्षेतील पहिल्या तीन प्रयत्नांमध्ये अपयश आले. पण चौथ्या प्रयत्नात 2007 मध्ये त्या आयएएस परीक्षा उत्तीर्ण झाली. त्यांनी 409 वा क्रमांक मिळवला.

IAS B.Chandrakala | Sarkarnama
B.Chandrakala IAS | Sarkarnama

कल्याणकारी योजना राबविल्यामुळे चर्चेत

बी चंद्रकला यांनी 2008 पासून आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी समाजकल्याण, वृक्षारोपण, पशुसंवर्धन, पर्यावरण आणि पंचायत संबंधित कल्याणकारी योजना यांसारख्या सर्व सरकारी योजना राबवल्या.

B.Chandrakala IAS | Sarkarnama

दबंग अधिकारी म्हणून ओळख

वेळप्रसंगी त्यांनी राजकीय नेत्यांसोबत घेतलेल्या कटुतेमुळे त्यांना त्याचा परिणाम म्हणून बदल्यांसह इतरही परिणाम भोगावे लागले. पण मेहनत आणि कर्तृत्वानं त्यांचं यश, कीर्ती वाढतच गेली. आत्तापर्यंत त्यांनी 5 जिल्ह्यांचं डीएम पद भूषवलं आहे. प्रत्येक ठिकाणी अवैध काम करणाऱ्यांमध्ये त्यांचा दबंग अधिकारी म्हणून ओळखल्या जातात.

B.Chandrakala IAS | Sarkarnama

NEXT : अमेरिकेत पाय ठेवताच मोदींनी भेट घेतली त्या तुलसी गबार्ड कोण?

Tulsi Gabbard | Sarkarnama
येथे क्लिक करा....