बदल्यांमध्ये हस्तक्षेप करू नका! महिला जिल्हाधिकाऱ्यांनी थेट मंत्री, खासदार, आमदारांनाच सुनावलं...

Rajanand More

IAS दिव्या मित्तल

दिव्या मित्तल या उत्तर प्रदेशातील देवरियाच्या जिल्हाधिकारी आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

IAS Divya Mittal | Sarkarnama

काय घडलं?

मंत्री, खासदार, आमदारांना बदल्यांवरून सुनावल्याचा हा व्हिडीओ आहे. जिल्हा योजना समिती (दिशा) च्या बैठकीतील हा व्हिडीओ आहे. भाजपचे खासदार शशांक त्रिपाठी बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

IAS Divya Mittal | Sarkarnama

मंत्री, आमदारांची उपस्थिती

बैठकीत दिव्या मित्तल यांच्यासह योगी सरकारमधील मंत्री विजयलक्ष्मी गौतम, भाजपचे प्रवक्ते व आमदार शलभ त्रिपाठी, आमदार सुरेंद्र चौरसिया, आमदार सभा कुंवर, खासदार रमाशंकर राजभर, आमदार देवेंद्र प्रताप सिंह तसेच वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

IAS Divya Mittal | Sarkarnama

अशी झाली सुरूवात

एका आमदाराने बैठकीत बदलीचा मुद्दा उपस्थित केला. यांसह इतर मुद्दे उपस्थित करत ते प्रशासनावर भडकले आणि बैठकीतून निघून गेले. त्यानंतर इतर काही लोकप्रतिनिधींनीही बदल्यांवर प्रशासनाला धारेवर धरले.

IAS Divya Mittal | Sarkarnama

मित्तल यांनी सुनावलं

दिव्या मित्तल यांनी लगेचच बैठकीत लोकप्रतिनिधींना सुनावलं. एखाद्या अधिकाऱ्यावर बदली किंवा पोस्टिंगसाठी दबाव टाकण्याचा अधिकार कोणत्याही लोकप्रतिनिधींना नाही. हे फक्त सरकार ठरवेल. त्याचे नियम आहेत, असे मित्तल यांनी स्पष्ट केले.

IAS Divya Mittal | Sarkarnama

अधिकाऱ्यांच्या टाळ्या

दिव्या मित्तल यांच्या उत्तरानंतर काही अधिकाऱ्यांनी टाळ्या वाजवल्या. कॅमेरामध्येही हे दृश्य कैद झाले आहे. त्यामुळेच हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

IAS Divya Mittal | Sarkarnama

दिव्या मित्तल कोण आहेत?

दिव्या मित्तल या 2013 च्या तुकडीच्या आयएएस अधिकारी आहेत. पारदर्शक कारभारामुळे त्यांचा प्रशासनात दबदबा आहे. त्या उच्चशिक्षित असून लंडनमध्येही नोकरी केली आहे. नोकरी सोडून त्या भारतात आल्या.

IAS Divya Mittal | Sarkarnama

आधी IPS

दिव्या यांनी 2012 मध्ये यूपीएससी क्रॅक केली होती. त्यावेळी त्या आयपीएस बनल्या होत्या. त्यांना गुजरात केडर मिळाले होते. पण 2013 मध्ये पुन्हा यूपीएससी क्रॅक करत त्या आयएएस बनल्या.

IAS Divya Mittal | Sarkarnama

पतीही IAS

दिव्या यांचे पती गगनदीप हेही आयएएस असून ते 2011 च्या तुकडीचे अधिकारी आहेत. त्यानंतर त्यांनी दिव्या यांनाही यूपीएससी परिक्षेसाठी प्रोत्साहित केले होते.

IAS Divya Mittal | Sarkarnama

NEXT : सरन्यायाधीश भूषण गवई जेव्हा सॅल्यूट ठोकतात...

येथे क्लिक करा.