Rajanand More
सरन्यायाधीश झाल्यानंतर भूषण गवई यांनी रविवारी पहिल्यांदाच आपल्या शाळेला भेट दिली. यावेळी ते भावूक झाले होते.
मुंबईतील गिरगांवमधील चिकित्सक समूहाचे शिरोळकर हायस्कूलमध्ये सरन्यायाधीशांनी इयत्ता 3री ते 7वी पर्यंत मराठी माध्यमातून शिक्षण घेतले होते.
माजी विद्यार्थी सरन्यायाधीश बनल्याने शाळेसाठीही रविवारचा दिवस अविस्मरणीय ठरला. त्यांचे त्यांचे शाळेत जल्लोषात स्वागत करण्यात आले.
सरन्यायाधीश गवई यांच्या स्वागतासाठी एससीसीतील विद्यार्थ्यांनी मागील काही महिन्यांपासून तयारी केली होती. हे अनोखे स्वागत पाहून सरन्यायाधीशांनी विद्यार्थ्यांना सॅल्यूट ठोकला.
शाळेतील जुन्या आठवणींचा उजाळा देताना सरन्यायाधीश भावूक झाले होते. जुने शिक्षक, मित्र भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
सरन्यायाधीशांनी यावेळी शाळेत येताना आई प्रवासखर्च आणि खाण्यासाठी २० पैसे द्यायची, अशी आठवणही सांगितली. पैशाचे मोल त्यावेळी कळाल्याचेही त्यांनी सांगितले.
मातृभाषेत शिक्षण घेतल्याने केवळ संकल्पनात्मक स्पष्टता वाढत नाही तर जीवनभराची मूल्ये देखील रुजतात, आपला पाया मजबूत होतो, असे यावेळी बोलताना सरन्यायाधीश म्हणाले.
आज आपण कोणत्याही पदावर असलो तरी त्यामध्ये शाळा आणि शिक्षकांची महत्वाची भूमिका राहिल्याचे सरन्यायाधीश गवईंनी सांगितले. शाळेमध्ये मिळालेल्या संधींमुळे आपल्यात आत्मविश्वास निर्माण झाल्याचेही ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.