Deepak Kulkarni
काही आयपीएस व आयएएस अधिकारी हे त्यांच्या कार्यशैली आणि इतर उल्लेखनीय गोष्टींमुळे 'सोशल मीडियावरील लोकप्रिय असतात.
भारतीय प्रशासकीय सेवेसोबतच त्यांनी वैद्यकीय आणि कला क्षेत्रातही त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची त्यांनी प्रभावी अंमलबजावणी करतानाच मिशनच्या 'डायरेक्टर' पदाची जबाबदारी सांभाळली आहे, तसेच कोरोना काळात केरळमधील 50 प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश झाला होता.
दिव्या यांनी 2014 मध्ये 48 वी 'रँक' मिळवत 'यूपीएससी' परीक्षा क्रॅक केली होती.
मूळच्या तिरुअनंतपुरमच्या असणाऱ्या दिव्या अय्यर या केरळ केडरच्या IAS अधिकारी असून विशेष म्हणजे त्यांनी 'एमबीबीएस'ची पदवी संपादन केली.
दिव्या यांचे पती के. एस. सबरीनाथन हे केरळमधील विरोधी पक्ष काँग्रेस पक्षाशी संबंधित आहेत.
आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. तसाच दिव्या यांंचा सार्वजनिक कार्यक्रमातील भाषणाचा व्हि़डिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
आपल्या तीन वर्षीय मुलाला कडेवर घेऊन एका सार्वजनिक कार्यक्रमात भाषण केलं होतं.या भाषणाची खूप चर्चा झाली होती.
एका मंत्र्याच्या मुलाखतीवेळीही त्यांनी त्यांच्या मुलाला सोबत नेलं होतं. त्याबाबत माहिती देताना त्या म्हणाल्या होत्या, मी संबंंधित मंत्र्यांची खूप दिवसांंपासून भेट घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या कार्यालयानं नेमकं माझ्या सुट्टीच्या दिवशीची वेळ दिली. मीसुद्धा त्या भेटीची वेळ मान्य करून दिलेल्या वेळी मुलाखत घेण्यासाठी मुलालासोबत घेऊन गेले होते.