Rashmi Mane
भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेल्या UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रत्येक उमेदवाराचे स्वप्न असते.
या आव्हानात्मक परीक्षेत फार कमी लोकांना यश मिळू शकले आहे, मात्र दिव्या तन्वर या ही परीक्षा दोनदा उत्तीर्ण होऊन सरकारमध्ये मानाचे स्थान मिळवण्यात यशस्वी ठरल्या आहेत.
दिव्या तन्वर यांनी 2021 मध्ये UPSC परीक्षा दिली तेव्हा त्यांनी पहिल्याच प्रयत्नात 438 वा क्रमांक मिळवला होता.
वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी दिव्या यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि आयपीएस अधिकारी पदही मिळवले.
परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांनी कोणतेही प्रशिक्षण घेतले नाही. स्वतः अभ्यास करत त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली.
त्यानंतर 2022 मध्ये पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली आणि 105 वा क्रमांक मिळवून आयएएस अधिकारी बनल्या.
दिव्या हरियाणातील महेंद्रगड येथील रहिवासी आहेत. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण महेंद्रगड येथील नवोदय विद्यालयात झाले.
दिव्या यांनी विज्ञान शाखेत पदवी शिक्षण तिने लगेचच यूपीएससीची तयारी सुरू केली.