Deepak Kulkarni
कोकणात उद्धव ठाकरे गटाला खिंडार पडलं आहे.
गेली अनेक वर्ष आमदार राहिलेले सूर्यकांत दळवी यांनी गुरुवार भाजपमध्ये प्रवेश केला.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश झाला.
दापोली विधानसभा मतदारसंघातून 25 वर्ष आमदार असलेल्या सूर्यकांत दळवी यांनी भाजप (BJP) मध्ये प्रवेश केला.
प्रवेश करताच दळवी यांनी आपल्या माजी नेतृत्वावर सडकून टीका केली.
एकनाथ शिंदे यांनी शिवेसेनेत बंड केल्यानंतर कोकणात उद्धव ठाकरेंना मोठा फटका बसला.
अनेक कार्यकर्त्यांसह दळवींनी कमळ हातात घेतलं.
सूर्यकांत दळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश करत कोकणात भाजपचं बळ अधिक वाढवलं आहे.
भाजप कोकणात बांधापर्यंत आलाय, मात्र तो अद्याप शेतापर्यंत पोहोचलेला नाही, भाजपला शेतापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडणं हे आता आमची जबाबदारी आहे, असेही दळवी म्हणाले.