IAS Gauri Joshi: 11 महिन्यांच्या बाळाच्या 'या' आईची पंचकुला आंदोलनातील शौर्यगाथा...

सरकारनामा ब्यूरो

नक्षलग्रस्त जिल्ह्यात सेवा

गौरी या 2009 बॅचच्या IAS अधिकारी आहेत. ओडिशाच्या कालाहांडी या नक्षलग्रस्त जिल्ह्यात त्यांनी सेवा बजावली होती.

IAS Gauri Joshi | Sarkarnama

पंचकुलातील आंदोलन

राम रहिम सिंगला दोषी ठरवल्याने हरियाणाच्या पंचकुलामध्ये खळबळ उडाली होती. संतप्त आंदोलकांनी शहरात गोंधळ घातला होता.

IAS Gauri Joshi | Sarkarnama

त्यांनाही इजा झाल्या

आंदोलन शांत करण्यासाठी त्या स्वत: रस्त्यावर उतरल्या. या वेळी संतप्त जमावाने त्यांच्यावरही दगडफेक आणि लाठीमार केला. यात त्या जखमी झाल्या होत्या.

IAS Gauri Joshi | Sarkarnama

परिस्थिती नियंत्रणात

नीडरपणे सामोरे जात त्यांनी अखेर परिस्थिती नियंत्रणात आणलीच. या त्यांच्या धाडसी कामगिरीने देशभरातील अनेकांची मने जिंकली.

IAS Gauri Joshi | Sarkarnama

11 महिन्यांचे बाळ अन् धाडसी कार्य

या घटनेवेळी त्यांना 11 महिन्यांचे बाळ असतानाही अजिबात न घाबरता हे धाडसी कार्य त्यांनी यशस्वीरित्या पार पाडले.

IAS Gauri Joshi | Sarkarnama

त्या दिवशी पहाटे 3 वाजता घरी

शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्या शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात फिरल्या. पहाटे 3 वाजता त्या घरी पोहोचल्या.

IAS Gauri Joshi | Sarkarnama

आंदोलकांना केले शांत

पंचकुलाच्या उपायुक्त या नात्याने त्यांनी प्रचंड काम केले. परिस्थिती आटोक्यात आणून गौरी यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती.

IAS Gauri Joshi | Sarkarnama

नक्षलग्रस्त भागातील भूमिका

ओडिशातील नक्षलग्रस्त प्रभावित भागात तैनात असताना स्थानिक महिलांना परिस्थितीशी लढण्यासाठी त्यांनी मदत केली होती.

R

IAS Gauri Joshi | Sarkarnama

Next :  ...म्हणून TMC पक्षाच्या मिमी चक्रवर्तींनी दिला खासदारकीचा राजीनामा!

येथे क्लिक करा