Deepak Kulkarni
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धक्का बसला आहे.
निवडणुकीआधीच त्यांना विद्यमान खासदारांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे.
खासदार मिमी चक्रवर्ती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
जादवपूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असलेल्या मिमी चक्रवर्ती बंगालमधील प्रसिद्ध अभिनेत्रीही आहेत.
त्यांनी आपला राजीनामा तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्याकडे सुपूर्त केला आहे.
पण अद्याप त्यांनी राजीनामा स्वीकारलेला नाही.
स्थानिक पक्ष नेतृत्वासोबत असलेल्या वादातून चक्रवर्ती यांनी राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. तसे त्यांनीही स्पष्ट केले आहे.
या वादावर मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे आश्वासन दिल्याचे चक्रवर्ती यांनी सांगितले.
चित्रपट क्षेत्रातून आलेल्या लोकांची प्रतिमा मलिन करणे खूप सोपे असते.
संबंधित व्यक्ती काम करत नसल्याचे सांगितले जाते, अशी नाराजी मिमी चक्रवर्ती यांनी व्यक्त केली. ग