Jagdish Patil
अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचा पती राज कुंद्राच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे.
पोर्नोग्राफी प्रकरणात जामीनावर तुरुंगाबाहेर असलेल्या कुंद्राच्या घरी ED ने छापेमारी सुरू केली आहे.
ईडीने राज कुंद्राच्या विरोधात काही दिवसांपूर्वी 'मनी लाँड्रिंग'चा गुन्हा दाखल केला आहे.
पोर्नोग्राफी बनविण्याच्या आरोपाखाली कुंद्राला जून 2021 मध्ये अटक करण्यात आली होती.
कुंद्राची कंपनी पोर्नोग्राफी बनवून त्या माध्यमातून बक्कळ पैसा कमावल्याचा आरोप पोलिसांनी केला होता.
एका तरुणीने कुंद्रा आणि त्याच्या कंपनीविरोधात तक्रार दिल्यानंतर हे रॅकेट उघडकीस आलं.
चित्रपट आणि ओटीटीमध्ये काम देण्याच्या बहाण्याने मुलींना पोर्न चित्रपटांमध्ये काम करण्यास भाग पाडत असल्याचं तक्रारीत म्हटलं होतं.
तक्रारीनंतर पोलिसांनी मालाड पश्चिम भागातील एका बंगल्यावर छापा टाकला.
हा बंगला पोर्नोग्राफी शुटिंगसाठी भाड्याने घेतला होता. या छाप्यात बॉलीवूड अभिनेत्रीसह 11 जणांना अटक करण्यात आली होती.