सरकारनामा ब्यूरो
हितेश मीना हे 2019च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. ते एका मुलाखतीत म्हणाले की, UPSC परीक्षा कधी आहे, या परीक्षेसाठी कोणती पुस्तके वाचावी लागणार, आणि यानंतर माझ्या पुढे कोणी गेलं तर माझ नाव बदला.
हरियाणातील रहिवासी असणारे हितेश मीना यांनी गढौली या गावातील शाळेतून शिक्षण पूर्ण केले आहे.
वाराणसीच्या आयआयटी काॅलेजमधून त्यांनी बी.टेक पदवी आणि आयआयटी दिल्लीमधून एम.टेक पदवी प्राप्त केली.
पदवीनंतर हितेश यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरु करत. दोनदा परीक्षा दिली. मात्र त्यांना दोनही वेळेला अपयश आले होते.
अखेर 2018ला तिसऱ्यांदा परीक्षा देत त्यांनी संपूर्ण भारतातून 417 वा रँक मिळवला.
2018ला त्यांनी भारतीय वन सेवा (IFS) ची परीक्षाही उत्तीर्ण केली होती.
मीना हे सध्या गुरुग्रामच्या अतिरिक्त उपायुक्त पदावर शहर जिल्हा नागरिक संसाधन माहिती अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.