Deepak Kulkarni
काही प्रशासकीय अधिकारी आपल्या दमदार कामगिरीमुळे तर काही आपल्या अफाट संपत्तीमुळे चर्चेत असतात.
केरळमधील आयएएस के.एम.अब्राहम यांच्याविरोधात न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहे.
आयएएस अधिकारी अब्राहम हे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचे माजी प्रधान सचिव राहिलेले आहेत.
उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.
त्यांची मुंबई ते केरळपर्यंत कोट्यवधीची संपत्ती असलेल्या के.एम. अब्राहम यांच्याविरोधात केरळ उच्च न्यायालयात सामाजिक कार्यकर्ते जोमोन पुथेनपुराक्कल यांनी याचिका दाखल केली होती.
केरळ न्यायालयाने या प्रकरणातील सर्व कागदपत्रे सीबीआयला सोपवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सीबीआयचे कोची युनिट या प्रकरणाचा तपास करणार असल्याची चर्चा आहे.
संपत्ती...
कोल्लम येथे आठ कोटी रुपयांचे तीन मजली शॉपिंग कॉम्प्लेक्स, तिरुवनंतपुरममध्ये एक अपार्टमेंट आणि मुंबईतील तीन कोटींच्या इमारतींचा याचिकेत उल्लेख करण्यात आला आहे.
केरळ हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत संबंधित संपत्ती ही अब्राहम यांनी 2000 ते 2015 या कालावधीत त्यांनी उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवल्याचा आरोप केला आहे.
अब्राहम यांच्याविरोधात दक्षता आणि भ्रष्टाचार विरोधी ब्युरो (VACB) कडून तपासात अधुरेपणा असल्याचा न्यायालयानं ठपका ठेवला आहे.