Roshan More
UCSC ची परीक्षा दरवर्षी लाखो उमेदवार देतात, परंतु त्यापैकी केवळ काहीच जण यशस्वी होतात.
हार न मानता संघर्ष केले तर सर्वात कठीण UPSC परीक्षा पास केली जाऊ शकते हेच IAS कुमार अनुराग यांच्या प्रवासातून दिसते.
कुमार अनुराग हे 2019 बॅचचे IAS अधिकारी आहेत.
त्यांचे मूळचे बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील आहे. आठवीपर्यंतचे शिक्षण हिंदी माध्यमातून पूर्ण केले. यानंतर त्यांनी आपले माध्यम बदलून इंग्रजी माध्यमात शिक्षण सुरू केले.
मिडिया रिपोर्टनुसार अनुराग हे काॅलेजला असताना एका विषयात नापास झाले होते. मात्र या अपयशाने खचले नाही अधिक मेहनत घेत त्यांनी अभ्यास सुरू केला.
2016 मध्ये मास्टर्स पूर्ण केल्यानंतर त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. 2018 मध्ये झालेल्या UPSC CSE परीक्षेत त्यांनी देशात 48वा क्रमांक पटकावला आणि IAS अधिकारी बनले.