Jagdish Patil
ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून सी. सदानंदन मास्टर, हर्षवर्धन श्रृंगला, डॉ. मीनाक्षी जैन उज्ज्वल निकम यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
निकम यांनी भाजपकडून 2024 ची लोकसभा लढवली पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र आता त्यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे.
राज्यासह देशातील महत्त्वाचे खटले लढविणारे अॅड. उज्ज्वल निकम यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीतून राजकारणात एन्ट्री घेतली.
मूळचे जळगाव जिल्ह्यातील असलेल्या निकम यांची देशभरात विशेष सरकारी वकील म्हणून ओळख आहे.
त्यांचा जन्म एका उच्च-शिक्षित कुटुंबात झाला. तर त्यांनी आपलं एल.एल.बीचं (LLB) शिक्षण जळगावातून पूर्ण केलं आहे.
1993 च्या बॉम्बस्फोट खटल्यामुळे सरकारी वकील म्हणून त्यांची कारकीर्द देशभरात गाजली. सुरूवातीला महाराष्ट्र सरकारचे आणि त्यानंतर सीबीआयचे वकील म्हणून त्यांनी काम केलं.
1993 मुंबई बॉम्बस्फोट खटला, गुलशन कुमार मर्डर केस, खैरलांजी हत्याकांड, 2008 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या, कोपर्डी बलात्कार प्रकरण असे महत्वाचे खटले त्यांनी हाताळलेत.
याच महत्वपूर्ण कामगिरीबद्दल 2016 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं.