IAS Kumar Ravi : इंजिनिअर ते मुख्यमंत्र्यांचे सचिव..! कोण आहेत प्रशासनात दबदबा असलेले कुमार रवी?

Rajanand More

कुमार रवी

कुमार रवी हे 2005 च्या तुकडीचे बिहार केडरचे IAS अधिकारी आहेत. रविवारी त्यांना मुख्यमंत्री सचिवालयात बढती मिळाली आहे.

IAS Kumar Ravi | Sarkarnama

इंजिनिअर

आयआयटी कानपूरमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक. ही पदवी प्राप्त केली. 2001 मध्ये मल्टीनॅशनल कंपनीत इंजिनिअर म्हणून करिअरला सुरूवात.

IAS Kumar Ravi | Sarkarnama

UPSC ची तयारी

नोकरी करत असतानाच यूपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू केला. 2003 मध्ये IRS मध्ये निवड झाली. त्यानंतर आयकर विभागात सहायक आयुक्त म्हणून रुजू.

IAS Kumar Ravi | Sarkarnama

IAS चे वेध

आयकर विभागात नोकरीत करत असतानाच IAS तयारी सुरूच ठेवली आणि 2005 मध्ये त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. उपजिल्हाधिकारीपदी त्यांची निवड झाली.

IAS Kumar Ravi | Sarkarnama

जिल्हाधिकारी

बिहारमध्ये सुपौर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून पहिल्यांचा काम सुरू केले. त्यानंतर दरभंगा व इतर जिल्ह्यांतही जिल्हाधिकारी म्हणून काम करत प्रशासनात ठसा उमटवला.

IAS Kumar Ravi | Sarkarnama

पटना गाजवले

कुमार रवी यांची 2018 मध्ये पटनाचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. यादरम्यान त्यांनी अतिक्रमणमुख्त अभियान राबवले. वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर दिला.

IAS Kumar Ravi | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले

पटनाचे जिल्हाधिकारी आणि सध्या आयुक्त म्हणून काम करत असताना त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे लक्ष वेधून घेतले.

IAS Kumar Ravi with Nitish Kumar | Sarkarnama

कामाची पावती

अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्यानंतर कुमार रवी यांना मुख्यमंत्री सचिवालयात बदली करण्यात आली आहे. आता ते थेट मुख्यमंत्र्यांसोबत काम करणार आहेत.

IAS Kumar Ravi | Sarkarnama

NEXT : फेसबुकवरून उमेदवारी जाहीर करणारे संजय पांडे कोण आहेत?

येथे क्लिक करा.