महिला जिल्हाधिकारी थेट केंद्रीय मंत्र्यांना खेचणार कोर्टात? 75 लाखांची लाच प्रकरण तापले...

Rajanand More

कुमारस्वामी

केंद्रीय मंत्री आणि जेडी(एस) नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी एका महिला जिल्हाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी आपली बदली रोखण्यासाठी ७५ लाख रुपयांची लाच दिली, असा कुमारस्वामी यांचा दावा आहे.

HD Kumaraswamy | Sarkarnama

लता कुमारी

हसन जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी, आयएएस अधिकारी लता कुमारी यांच्यावर हा आरोप झाला आहे. जिल्ह्याचे प्रभारी मंत्री के. एम. शिवलिंगेगौडा यांनी ही लाचेची रक्कम स्वीकारल्याचा आरोप केंद्रीय मंत्र्‍यांनी केला आहे.

IAS Latha Kumari | Sarkarnama

व्हॉट्सॲप संभाषण

कुमारस्वामी यांनी याबाबत एक अज्ञात व्यक्ती आणि लता कुमारी यांचे वैयक्तिक सहाय्यक शशिकिरण यांच्यातील व्हॉट्सॲप संभाषणाचा जाहीर केले आहे.

WhatsApp | Sarkarnama

कोण आहेत लता कुमारी?

आयएएस अधिकारी के. एस. लता कुमारी या कर्नाटक केडरच्या २०१२-बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी राज्य नागरी सेवेतून (SCS) पदोन्नतीद्वारे आयएएसपर्यंत मजल मारली आहे.

IAS Latha Kumari | Sarkarnama

जिल्हाधिकारी

कर्नाटकातील हसन जिल्ह्याच्या उपायुक्त आणि जिल्हाधिकारी म्हणून जून २०२५ पासून कार्यरत आहेत. याच काळातील कामकाजावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

IAS Latha Kumari | Sarkarnama

आरोप फेटाळले

लता कुमारी यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. आपण किंवा कार्यालयाने कोणत्याही अनधिकृत कार्यात भाग घेतला नाही. वैयक्तिक सहाय्यकाने किंवा अन्य कोणीही अनुचित संदेश पाठवले असतील, तर कारवाई केली जाईल, असेही त्या म्हणाल्या आहेत.

IAS Latha Kumari | Sarkarnama

पोलिसांत तक्रार

लता कुमारी यांनी या प्रकरणाची पोलिसांत तक्रार केली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आणि जनतेमध्ये खोटी माहिती पसरवणाऱ्यांना ओळखले जाईल आणि त्यांना जबाबदार धरले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

IAS Latha Kumari | Sarkarnama

सत्य समोर येईल

गैरकृत्यासाठी दोषी आढळलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि चौकशीतून सत्य समोर येईल, असे सांगत लता कुमारी यांनी थेट कुमारस्वामी यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

IAS Latha Kumari | Sarkarnama

NEXT : सोनिया गांधींच्या आयुष्यातील खास क्षण; पहिल्यांदाच समोर आले दुर्मिळ फोटो

येथे क्लिक करा.