सरकारनामा ब्यूरो
मोनिका यादव यांनी कठोर परिश्रम करणारे कधीही अपयशी ठरत नाहीत हे सिद्ध केलं आहे.
त्या राजस्थान मधील सीकर जिल्ह्यातील लिसाडिया गावच्या कन्या आहेत. वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी IAS अधिकारी झाल्या.
22 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मोनिका यादव या 403 रँक मिळवणाऱ्या IAS अधिकारी ठरल्या आहेत.
मोनिका यादव यांचे पतीदेखील IAS अधिकारी आहेत. तर त्यांचे वडील हरफूलसिंह यादव हे देखील सिनिअर IRS अधिकारी आहेत त्यांच्यामुळेच मोनिका यांना प्रशासकीय सेवेत काम करण्याची प्रेरणा मिळाली.
अनेक तरूणांसाठी त्या प्रेरणा आहेत. त्या स्वत: सोशल मिडीयावर जास्त अॅक्टिव्ह नसतात परंतू बरेच इंफ्लूएसर त्यांचे फोटो आणि विचार आपल्या अकांउटला पोस्ट करत असतात.
मोनिका यांनी IAS अधिकारी होण्यापूर्वी NET, JRF आणि CA या कठीण परिक्षेत देखील यश संपादन केलेले आहे.
IAS सारख्या मोठ्या पदावर पोहोचल्यानंतरही त्यांनी आपल्या गावची परंपरा आणि साधेपणा जपला आहे.
शिक्षण हे एकमात्र साधन आहे जे आपल्याला जागरूक आणि सक्षम बनवते. नेहमी स्वप्न पाहा आणि पुर्ण करण्यासाठी स्वत: ला झोकून द्या'.