सरकारनामा ब्यूरो
महाराष्ट्रातील समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) ही भरती ग्रुप-C प्रकारातील कंत्राटी भरती असणार आहे. शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांकडून निश्चित वेळेत अर्ज मागविण्यात आले आहेत.
एकूण 1974 जागांसाठी भरती ही भरती असणार आहे. तसेच निवड झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 डिसेंबर 2025 असणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या https://nhm.maharashtra.gov.in वेबसाइटवर सविस्तर जाहीरात, पात्रता, कागदपत्रांची यादी आणि सूचना व्यवस्थित वाचावे. सरकारी नोकरीची महत्वकांक्षा असणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार केवळ महाराष्ट्राचे रहिवासीच अर्ज करू शकतील. आयुर्वेदिक मेडिसिन पदवी (BAMS) (BUHS)/ B.Sc (नर्सिंग) / B.Sc (कम्युनिटी हेल्थ)
वयाची अट : 04 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
भरतीसाठी पात्र उमेदवार या https://nhm.maharashtra.gov.in अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करू शकतात. उमेदवारांसाठी जाहीरात व सर्व माहिती NHM च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.
ऑनलाइन अर्ज करताना सुरूवातीला प्रोफाईल रजिस्ट्रेशन करून आॅनलाईन अॅप्लिकेशन सबमिशन करावे. नंतर परीक्षा शुल्क भरायचा आणि फोटो व सही अपलोड करून अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.
सर्वसाधारण प्रवर्ग: ₹1000 मागास प्रवर्ग:
₹900 अनाथ उमेदवार: ₹900
माजी सैनिकांसाठी कसलेही शुल्क आकारले जाणार नाही
शुल्क फक्त ऑनलाइन पद्धतीने भरून पावती जतन करणे आवश्यक आहे.