सरकारनामा ब्यूरो
मुद्रा यांना डाॅक्टर म्हणून दोन सुवर्ण पदक मिळाली आहेत तरीही त्यांनी त्यांच मास्टर ऑफ डेंटल सर्जरी (MDS)चं शिक्षण वडीलांसाठी सोडलं. काय आहे या मागचं कारण चला जाणून घेऊयात..
उत्तराखंड येथील चमोली जिल्हातील कर्णप्रयाग हे त्यांच मुळ गाव असून सध्या त्या दिल्ली येथे राहतात.
लहानपणापासून मुद्रा अभ्यासात प्रचंड हुशार होत्या. 10वी मध्ये 96% तर 12 वी बोर्ड परीक्षेत त्यांना 97% इतके मार्क्स मिळाले. त्यानंतर त्यांनी बीडीएस करत असतानाही त्यांना सुवर्ण पदक मिळाले होते.
दिल्लीत आल्यानंतर त्यांनी 'एमडीएस'साठी प्रवेश घेतला.
मुद्रा एमडीएस च्या परीक्षेची तयारी करत होत्या परंतु त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी IAS बनवं. त्यांच्या वडिलांसाठी त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरु केली.
तरीही त्यांनी UPSC ची तयारी सुरुच ठेवली. 2020 मध्ये पुन्हा एकदा परीक्षा दिली मात्र त्या मेन्स पास करु शकल्या नाहीत. हार न मानता 2021मध्ये दुसऱ्यांदा परीक्षा दिली त्यात त्यांनी165 क्रमांक पटकावत यश मिळवलं.
IPS या पदासाठी त्यांची निवड करण्यात झाली. तरीही त्यांनी पुन्हा 2022 मध्ये 'यूपीएससी' ची परीक्षा देत 53वा रँक मिळवला. त्यांच्या वडिलांच 'आयएएस' होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.