Rashmi Mane
आपण जर आपल्या निर्णयावर ठाम असू आणि यशस्वी व्हायचे ध्येय आपल्याकडे असेल तर त्याला त्याच्या मार्गावर जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
असंच काहीस घडलं उत्तराखंडच्या ऋषिकेश येथील नमामी बन्सल यांच्या बाबतीत.
ज्यांनी यूपीएससी परीक्षेत अनेकदा अपयश येऊनही हार मानली नाही आणि सतत प्रयत्न करून अखेर 'आयएएस' पद मिळवले.
नमामीच्या घरची आर्थिक परिस्थितीही चांगली नव्हती. तिचे वडील राज कुमार बन्सल भांड्यांचे दुकान चालवत होते, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे.
नमामी वाचनात आणि लेखनात खूप हुशार होती. तिने शाळेतही नेहमीच चांगली कामगिरी केली होती. जवळजवळ प्रत्येक विषयात तिला चांगले गुण असायचे.
मात्र, जेव्हा तिने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली तेव्हा तिला अनेक अपयशांना सामोरे जावे लागले.
नागरी सेवा परीक्षेतील तीन अयशस्वी प्रयत्नांनंतरही, त्यांनी कधीही हार मानली नाही
चौथ्या प्रयत्नात ऑल इंडिया रँक 17 व्या क्रमांक मिळवत UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.