Roshan More
IAS नेहा मारव्या सिंह या पु्न्हा चर्चेत आल्या आहेत.वर्षभरात त्यांची चौथ्यांदा बदली करण्यात आली आहे.
तुकारम मुढे हे आपल्या धडाकेबाजी कार्यवाहीसाठी ओळखले जातात, त्याच प्रमाण लेडी नेहा मारव्या सिंह या देखील मध्य प्रदेश केडरमध्ये धडाकेबाज अधिकारी म्हणून परिचित आहेत.
वर्षभरात चौथ्यांदा बदली झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आयएएस असोसिएशनकडून हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
नेहा सिंह या 2011 च्या बॅचच्या अधिकारी आहेत. मध्य प्रदेश त्यांचे केडर आहे.
15 वर्षात त्यांची 11 वेळा बदली करण्यात आली आहे. यंदा अवघ्या 50 दिवसात त्यांची बदली केल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
आता त्यांची मध्य प्रदेशच्या अनुसूचित जमाती वित्त आणि विकास महामंडळात प्रबंध संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे.
MNNIT इलाहाबादमधून त्यांनी बीटेक केले आहे.
प्रशासनात आल्यानंतर त्यांची तब्बल 14 वर्षाने डिंडौरीच्या कलेक्टर म्हणून 2025 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, अवघ्या आठ महिन्यात त्यांची बदली करण्यात आली.