बिहारविषयी कुणी वाईट बोलले तर..! महाराष्ट्रातील IAS देवरेंचा नितीश कुमारांच्या राज्यात दबदबा...

Rajanand More

IAS निलेश देवरे

IAS निलेश देवरे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. ते सध्या बिहारमधील पर्यटन विभागाचे सचिव आणि नागरी उड्डाण विभागाचे विशेष सचिव म्हणून कार्यरत आहेत.

IAS Nilesh Deore | Sarkarnama

डॉक्टर

देवरे यांनी २०१० मध्ये एमबीबीएस पदवी मिळविली आणि २०११ मध्ये लगेच यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांना बिहार केडर मिळाल्यानंतर २०१२ पासून त्यांनी राज्याच्या प्रशासकीय सेवेत काम सुरू केले.

IAS Nilesh Deore | Sarkarnama

मुळचे नाशिकचे

निलेश देवरे हे मुळचे नाशिकचे आहेत. सटाणा हे त्यांचे मुळगाव असून मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील सरकारी नोकरीतून निवृत्त झाले आहेत.

IAS Nilesh Deore | Sarkarnama

विमान प्रवास वादात

राष्ट्रीय जनता दलासह काँग्रेसने त्यांच्या चार्डर्ट विमान प्रवासावरून नितीश कुमार सरकारवर निशाणा साधला आहे. देवरे यांनी कुटुंबासह वर्षभरापूर्वी केलेला चार्टर्ड विमानातून केलेला प्रवास वादात सापडला आहे.

IAS Nilesh Deore | Sarkarnama

सरकार पाठिशी

वादानंतर बिहार सरकारमधील मंत्र्यांनी देवरे यांची पाठराखण केली आहे. ते विमान दिल्लीतून पाटणाला रिकामे परत येणार होते. त्यामुळे देवरे यांनी त्यातून प्रवास केला तर कुठे बिघडले, असे मंत्री म्हणाले आहेत.

IAS Nilesh Deore | Sarkarnama

बिहारशी खास नाते

देवरे यांनी आतापर्यंत मधुबनी आणि छपरा या जिल्ह्यांचे ते जिल्हाधिकारी होते. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे खासगी सचिव म्हणून त्यांनी २०२२ मध्ये काम केले. त्यावेळी ते पश्चिम चंपारणचे DM होते. त्यांनी आपल्या कामातून दबदबा निर्माण केला आहे.

IAS Nilesh Deore | Sarkarnama

वाईट बोलले तर...

काही वर्षांपूर्वी एका वृत्तवाहिनी दिलेल्या मुलाखतीमध्ये देवरे म्हणाले होते की, IAS ही एक अशी सेवा आहे, ज्यामध्ये तुम्हाला जे केडर मिळते, तुम्ही त्या राज्यात मिसळून जातात. मीही बिहारमध्ये मिसळून गेलोय. बिहारविषयी कुणी वाईट बोलले तर मी विरोध करतो.

IAS Nilesh Deore | Sarkarnama

महाराष्ट्राची संस्कृती

इतकी वर्षे बिहारमध्ये असूनही देवरे आणि त्यांच्या कुटुंबाचे महाराष्ट्राशी असलेले नाते घट्ट आहे. मराठी सण ते बिहारमध्येही धुमधडाक्यात साजरे करतात, असे देवरे यांनी मुलाखतीत सांगितले होते. 

IAS Nilesh Deore | Sarkarnama

NEXT : ब्रिटीश महिलेशी 2010 मध्ये ओळख, तीन वर्षांत लग्न..! खासदार अडकला भारतविरोधी षडयंत्रात?

येथे क्लिक करा.