सरकारनामा ब्यूरो
दक्षिण दिल्ली येथे SDM (Sub Divisional Magistrate) म्हणून तैनात असलेले आयएएस अभिनव सिवाच यांनी 12 व्या रँकसह नागरी सेवा परीक्षेत यश संपादन केले.
दिल्लीपूर्वी ते फतेहाबादमधील टोहाना येथे सहा महिने तहसीलदार पदावर कार्यरत होते.
अभिनव सिवाच हे मूळचे हरियाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यातील आहेत.
अभिनव हे एक हुशार अन् संयमी व्यक्तिमत्त्व असलेले अधिकारी आहेत, ज्यामुळे त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली.
UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी 30 लाख रुपयांचे पॅकेज असलेली नोकरी सोडली.
सोशल मीडियापासून दूर राहून त्यांनी रोज सुमारे सात ते आठ तास सलग अभ्यास केला अन् आयएएस झाले.
दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून त्यांनी बीटेक आणि आयआयएम कोलकाता येथून एमबीए पूर्ण केले.
शिक्षणानंतर व्यवस्थापन सल्लागार आणि गुंतवणूक बँकर म्हणून त्यांनी अनेक कंपन्यांमध्ये नोकरी केली.
बीटेक अन् एमबीए पदवीधर अभिनव यांना लहानपणापासूनच नागरी सेवांची आवड होती म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले.
R