सरकारनामा ब्यूरो
जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर येथील अंबिका रैना यांचे वडील लष्करात मेजर जनरल पदावर कार्यरत आहेत.
वडिलांची नोकरी बदली होणारी असल्यामुळे देशातील विविध राज्यातून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले.
अभ्यासात हुशार असलेल्या अंबिका यांना त्यांच्या आई-वडिलांनी नेहमीच पाठिंबा दिला आहे.
गुजरातमधील अहमदाबादच्या CEPT विद्यापीठातून त्यांनी आर्किटेक्चरमध्ये पदवी प्राप्त केली.
त्यानंतर त्यांनी स्वित्झर्लंडमधील झुरिच येथील एका नामवंत कंपनीत इंटर्नशिप केली.
देशासाठी काहीतरी करण्याचा विचार मनात येताच यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी त्यांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला.
पहिल्या दोन प्रयत्नांत अपयशी ठरल्यानंतरही त्यांनी हार न मानता अधिक अभ्यास केला.
ध्येयाबद्दल आणि प्रत्येक अडचणींवर मात करत तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी 164 व्या रँकसह परीक्षेत यश मिळवले.
यूपीएससी मुख्य परीक्षेसाठी त्यांनी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टॉपर्स कॉपी, मुलाखत आणि उत्तर लेखनाचा सराव केला.