IAS Amit Kale: घुंगरांचा अन् ढोलकीचा आवाज ऐकत बालपण गेलं! तमाशा कलावंतीणीचा लेक झाला कलेक्टर

Mangesh Mahale

राजश्री काळे

लावणीला जिवंत ठेवण्यासाठी नगरमधल्या सुप्यात कालिका कला केंद्र चालवणाऱ्या राजश्री काळे यांचे ते सुपुत्र आहेत.

Success Story Of IAS Officer Amit Kale

यूपीएससी

कला केंद्रात अमित यांचे बालपण घुंगरांचा आणि ढोलकीचा आवाज ऐकत गेलं, यूपीएससी उत्तीर्ण होऊन ते कलेक्टर झाले.

Success Story Of IAS Officer Amit Kale

शिक्षणासाठी पुण्यात

ढोलकीशी सलगी नको, म्हणून राजश्रीताईंनी काळजावर दगड ठेवत अमित यांना शिक्षणासाठी पुण्यात पाठवलं होते.

Success Story Of IAS Officer Amit Kale

आईचं स्वप्न पूर्ण

तुला कलेक्टर व्हायचंय, असं आईनं लहानपणीच अमित यांना सांगितले, अन् त्यांनी आईचं स्वप्न पूर्ण केलं.

Success Story Of IAS Officer Amit Kale

पहिलंच नाव असेल...

अमित मारुतराव काळे...यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झालेलं कोल्हाटी समाजातलं हे कदाचित पहिलंच नाव असेल.

Success Story Of IAS Officer Amit Kale

रात्रंदिवस मेहनत

तीन वेळा अपयश आले पण त्यांनी अजिबात हार मानली नाही. ध्येय गाठण्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली.

Success Story Of IAS Officer Amit Kale

चौथ्यांदा यश

सर्वप्रथम सोप्या विषयाचा अभ्यास करून मग कठीण विषयावर लक्ष केंद्रीत करुन त्यांनी चौथ्यांदा यश संपादन केलं.

Success Story Of IAS Officer Amit Kale

आयएएस

अमित काळे यांनी 2018 मध्ये 212व्या रँकसह आयएएस बनण्याचे आईचं स्वप्न अखेर पूर्ण केले.

'सक्सेस' मंत्र

'अपयशाला घाबरू नका आणि यश मिळेपर्यंत चालत राहा' हा 'सक्सेस' मंत्र अमित काळे यांनी दिला आहे.

NEXT : शेवटच्या श्रावणी सोमवारी मुख्यमंत्री शिंदे भीमाशंकर मंदिरात! पाहा खास फोटो

येथे क्लिक करा