सरकारनामा ब्युरो
असे म्हणतात की, देवाने एक दरवाजा बंद केला तर तो दुसरा दरवाजा उघडतो. भारतात दरवर्षी लाखो विद्यार्थी UPSC परीक्षेची तयारी करतात. पण नशीब अन् माणसं साथ देत नाही. मात्र, काही जण निराश न होता नव्याने सुरुवात करतात. अशीच सक्सेस स्टोरी आहे कैलास मंजू बिश्नोई यांची...
कैलाश मंजू हे मुळचे जोधपूरचे असून ते लेखक, पत्रकार आहेत.
त्यांनी जय नारायण व्यास या काॅलेज मधून डिग्री मिळवली. यानंतर त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरु केली.
असे सांगितले जाते की UPSC ची तयारी करताना त्याचे एका मुलीसोबत प्रेम झाले. मात्र, ती अधिकारी झाल्यानंतर तिने मंजू यांची साथ सोडली.
मंजू यांचे अधिकारी होण्याच्या स्वप्न पूर्ण झाले नाही मात्र 'UPSC वाला लव्ह कलेक्टर साहिबा' हे पुस्तक त्यांनी लिहिले.
कैलाश यांनी या पुस्कात एका IAS अधिकाऱ्याबद्दल लिहिली आहे. त्यांचा जीवनसंघर्ष कसा असतो. IAS परीक्षेची तयारी करताना प्रेम आणि विश्वासघात असे प्रसंगाबाबत लिहिले आहे.
कैलाश मंजू यांनी हे पुस्तक 5 महिन्यात लिहिले. या पुस्तकाला मोठा प्रतिसाद मिळाला. हातोहात या पुस्तकाच्या सर्व प्रती विकल्या गेल्या.
आतापर्यंत 'UPSC वाला लव्ह कलेक्टर साहिबा' या पुस्काच्या 1 लाख 50 हजार प्रती विकले गेल्या आहेत.
या पुस्तकावर त्यांना चित्रपट बनवण्याची ऑफरही आली आहे.
या पुस्तकाच्या विक्रीतून कैलाश यांनी सुमारे अडीच ते तीन कोटी रुपये कमावले आणि त्यामुळे ते करोडपती झाले.
मंजू यांच्या पुस्तकाला मिळालेल्या प्रतिसाद पाहून त्यांनी 'UPSC वाला लव्ह कलेक्टर साहिबा -2 ' असे दुसरे पुस्तक लिहिले त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला.