Rashmi Mane
मराठवाड्याचं प्रशासन कोळून प्यायलेल्या दीपा मुधोळ मुंडे पुण्यात नवा कार्यभार सांभाळणार आहेत.
दीपा मुधोळ मुंडे यांची यांची पुण्यात समाज कल्याण आयुक्त म्हणून आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. जाणून घ्या त्यांच्याबद्दल प्रेरणादारी प्रवास....
2011 बॅचच्या आयएएस अधिकारी, ज्यांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी उल्लेखनीय प्रशासकीय कामगिरी बजावली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून दीपा मुधोळ मुंडे यांनी कारकिर्दीची सुरुवात केली.
बुलढाण्याहून त्या औरंगाबादमधील GST विभागात कार्यरत झाल्या. तिथेही त्यांनी उत्तम प्रशासकीय काम केले.
इतिहासात पहिल्यांदाच बीडच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. बीडच्या जिल्हाधिकारी म्हणून दीपा मुधोळ-मुंडे यांनी यशस्वीपणे कामकाज सांभाळले होते. .
पुण्यात याआधी दीपा मुधोळ या 'पीएमपीएमएल'च्या तिसऱ्या महिला अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.
लातूरला महापालिका आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यासोबतच त्यांनी आजपर्यंत औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, बीड या चारही प्रमुख जिल्ह्यात काम केले आहे.