सरकारनामा ब्यूरो
मूळच्या लखनौ येथील गुंजन द्विवेदी यांचा सुरुवातीपासूनच नागरी सेवांकडे कल होता.
दिल्ली विद्यापीठाच्या दौलत राम कॉलेजमधून त्यांनी राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली.
वडील माजी आयपीएस अधिकारी असल्याने घरातील वातावरणही तसेच होते.
ग्रॅज्युएशन पूर्ण करताच त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली होती.
पहिल्या आणि दुसऱ्या प्रयत्नांतील अपयशानंतर त्यांनी अभ्यासाची रणनीती बदलली.
तिसऱ्या प्रयत्नात अधिक चिकाटीने अभ्यास करत त्यांनी परीक्षेत यश मिळवले.
यूपीएससीच्या परीक्षेत राज्यशास्त्र हा त्यांचा पर्यायी विषय होता.
कठोर परिश्रमाने पाच वर्षांच्या दीर्घ संघर्षानंतर नऊव्या रँकसह त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.