Rashmi Mane
प्रशासकीय क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येक उमेदवाराचे यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे स्वप्न असते.
एका कर्मचाऱ्याची IAS पदावर नियुक्ती केली जाते, यामध्ये प्रशिक्षणानंतरचे पहिले पद म्हणजे सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट म्हणजे SDM या पदी नियुक्ती करण्यात येते.
आयएएसचे सर्वात मोठे पद जिल्हा दंडाधिकारी आहे असे बहुतेकांना वाटते, परंतु प्रत्यक्षात तसे नाही.
IAS मधील सर्वात मोठे पद हे कॅबिनेट सचिव आहे.
केंद्रीय स्तरावर ते आयएएस अधिकाऱ्याचे बॉस मानले जातात.
सध्या भारताचे कॅबिनेट सचिव राजीव गौबा आहेत.
राज्य पातळीवर कॅबिनेट सचिवांप्रमाणेच मुख्य सचिव हा सर्वात मोठा अधिकारी असतो.
R