Rashmi Mane
टीना डाबी या 'आयएएस' अधिकारी नेहमीच त्यांच्या कामामुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्या एका विशेष कारणासाठी देशभरात गौरविल्या गेल्या आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते टीना डाबी यांना ‘कॅच द रेन – रेन वॉटर हार्वेस्टिंग’ मोहिमेसाठी विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.
टीना डाबी या राजस्थानातील बारमेर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आहेत. दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात त्यांनी जलसंवर्धनाची मोठी क्रांती घडवून आणली.
‘कॅच द रेन’ अंतर्गत पावसाचे पाणी साठवण्याची पारंपारिक आणि आधुनिक पद्धती एकत्रित करून त्यांनी मोठ्या प्रमाणावर रेन वॉटर हार्वेस्टिंगची मोहिम राबवली आहे.
या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात तब्बल 87,000 पाणी साठवणूक टाक्या उभारण्यात आल्या. गावोगावी झालेल्या या कामामुळे पाणी साठवणीची क्षमता प्रचंड वाढली.
या टाक्यांमुळे पावसाळ्यानंतरही 3 ते 4 महिने स्वच्छ पाणी उपलब्ध होऊ लागले. यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन मोठ्या प्रमाणात सुलभ झाले.
टाक्यांसोबतच गावांतील तलाव, नद्या आणि इतर जलस्रोतांत पावसाचे पाणी साठवण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर काम करण्यात आले. जलस्रोत पुनर्भरणामुळे भूजलपातळीही सुधारली.
बारमेर जिल्ह्याच्या जलसंवर्धनातील या उल्लेखनीय कार्यामुळे जिल्ह्याला आणि टीना डाबी यांना राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली. या योजनेसाठी 2 कोटी रुपयांचा पुरस्कारही देण्यात आला.
दुष्काळी भागात पाणी पोहोचवण्याचे आव्हान स्वीकारत टीना डाबी यांनी दाखवून दिलं की सक्षम नेतृत्व आणि योग्य नियोजनाने कोणताही बदल शक्य आहे. त्यांचे हे कार्य आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.