सरकारनामा ब्यूरो
आयएएस अधिकारी ईश्वर्या रामनाथन यांनी वयाच्या 24 व्या वर्षी यूपीएससीची परीक्षा पास केली.
देशातील सर्वात तरुण अधिकाऱ्यांपैकी एक असून, त्यांनी तब्बल दोनदा यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
सध्या त्या तमिळनाडूच्या तिरुवल्लूरमध्ये उपजिल्हाधिकारी (SDM) पदावर कार्यरत आहेत.
लहानपणापासूनच त्यांना अधिकारी व्हायचे होते, कारण त्यांनी कलेक्टर व्हावे अशी त्यांच्या आईची ईच्छा होती.
समुद्र किनारपट्टीजवळ घर असल्याने त्या अशा वातावरणात मोठ्या झाल्या जिथे पूर, वादळ यांसारख्या भयानक संकटांचा त्यांना नेहमीच सामना करावा लागला.
2014 च्या त्सुनामीवेळी एका कलेक्टरने खूप उत्तमरित्या परिस्थिती सांभाळली. त्यांचे हे काम पाहून ईश्वर्या यांनीही अधिकारी होण्याचा मनाशी ठाम निश्चय केला.
चेन्नईच्या अण्णा विद्यापीठातून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली होती.
पहिल्याच प्रयत्नात 630 व्या रँकने रेल्वे लेखा सेवेचे पद मिळवले. मात्र, त्यांना आयएएस अधिकारी व्हायचे होते.
त्यांनी पुन्हा परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला आणि पुढील वर्षातच दुसऱ्यांदा परीक्षा दिली. 47 व्या रँकसह आयएएस अधिकारी पद मिळवून आपले स्वप्न पूर्ण केले.
R