सरकारनामा ब्यूरो
पी अरविंदन यांनी नागरी सेवा परीक्षा देऊन भारतीय पोलिस दलात सामील होणे निवडले, या निर्णयाचा त्यांना कधीही पश्चाताप झाला नाही.
IBM मधील चांगल्या पगाराची नोकरी सोडून जनतेच्या सेवेसाठी त्यांनी प्रशासकीय सेवेची निवड केली.
बिट्स पिलानीमधून काॅम्प्युटर इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर बंगळुरूच्या IBM मध्ये त्यांनी एक वर्ष नोकरी केली.
सॉफ्टवेअर क्षेत्रात एक्सपोजर हवा होता म्हणून त्यांनी नोकरी जाॅइन केली.
महाविद्यालयाच्या तिसऱ्या वर्षात शिकत असतानाच त्यांनी आयपीएस व्हायचे ठरवले होते.
नोकरीचा राजीनामा दिला आणि UPSC कोचिंगसाठी ते दिल्लीला रवाना झाले. 164 व्या रँकसह त्यांनी यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळवले.
सध्या तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी आणि लक्षद्वीपच्या अधिकार क्षेत्रासह नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे चेन्नई झोनल डायरेक्टर पदावर ते कार्यरत आहेत.
तामिळनाडूमध्ये आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. ज्यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत.
तामिळनाडू पोलिस दलाच्या कामात तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी कार्यक्षमता वाढवल्या.
R