Deepak Kulkarni
संजय कुमार मिश्रा यांना पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे (ईएसी-पीएम) पूर्णवेळ सदस्य म्हणून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
मिश्रा यांना 2018 मध्ये त्यांना प्रथम दोन वर्षांच्या निश्चित कालावधीसाठी ईडीचे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
आयआरएस अधिकारी
संजय कुमार मिश्रा हे 1984 च्या बॅचचे भारतीय महसूल सेवा अधिकारी (आयआरएस) आहेत.
त्यांनी आयकराच्या अनेक महत्त्वाच्या प्रकरणांच्या तपासातही महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.
मोदी सरकारने संजय कुमार मिश्रा यांना अनेकवेळा मुदतवाढ दिली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर त्यांना सप्टेंबर 2023 मध्ये हे पद सोडावे लागले.
मिश्रा यांनी त्यांच्या ईडीच्या संचालकपदाच्या कार्यकाळात बेधडकपणे अनेक बड्या नेत्यांवर कडक कारवाई केली होती.
मिश्रा यांनी ईडीसह तपास संस्थांची जबाबदारी सांभाळत असताना सुमारे 4 हजार प्रकरणे नोंदवली होती आणि 3 हजारांहून अधिक तपासमोहिमा राबवल्याची माहिती आहे.
माजी अध्यक्ष विवेक देबरॉय यांच्या निधनानंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे. 1 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांच्या निधनानंतर हे पद रिक्त होते. मोदी सरकारनं एका अनुभवी व सक्षम अधिकाऱ्याकडे जबाबदारी दिली आहे.