Deepak Kulkarni
आयुष्यात कितीही मोठी संकटे आली तरी जिद्दीच्या जोरावर आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकतो यांचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रेरणा सिंह आहेत.
वयाच्या 13 व्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्या आई झारखंडमध्ये पशुचिकित्सा विभागात क्लर्क म्हणून नोकरीस होत्या.
झारखंडच्या रहिवासी असलेल्या प्रेरणा सिंह यांनी त्यांचे बालपण खूप हालाखीच्या परिस्थितीत घालवले आईच्या प्रेरणेमुळे त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले.
त्यांनी समाजशास्त्रात ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यानंतर समाजशास्त्र मास्टर्सची पदवी प्राप्त केली.
पदवीनंतर त्यांनी एचआर म्हणून नोकरीला सुरुवात केली. पण सामाजिक कार्य करण्याची इच्छा त्यांना सतत सतावत होती.
कालांतराने त्यांनी ही नोकरी सोडली आणि UPSC परीक्षेची तयारी सुरु केली. परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात त्यांना प्रिलियम्समध्ये 2 गुणांमुळे अपयशाचा सामना करावा लागला. त्यानंतर पुढच्या दोन प्रयत्नातही त्यांना अपयश आले.
प्रेरणा यांनी त्यांचा आत्मविश्वास कमी न होऊ देता. परीक्षेची तयारी सुरु ठेवली.
चौथ्यांदा प्रयत्न करत असताना त्यांना लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये पब्लिक पॉलिसीचा अभ्यास करण्याची ऑफर मिळाली होती. पण UPSC परीक्षेचा तयारी करण्याचे सांगत त्यांनी ती संधी धुडकावून लावली.
2023 ला चौथ्या प्रयत्नात त्यांनी परीक्षा उत्तीर्ण करत ऑल इंडिया 271वा रँक मिळवला. रँक नुसार त्याची नेमणूक IAS पदासाठी करण्यात आली.