Roshan More
धुलिवंदन सणाच्या निमित्ताने राजकीय नेत्यांनी आपल्या परिवारासह, कार्यकर्त्यांसोबत रंग खेळला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या परिवारासह रंग खेळले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे नेते, पदाधिकारी यांच्यासह ठाणे शहरात रंग खेळले.
एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातील टेंभीनाका येथील आनंदआश्रमात जाऊन आपले गुरू आनंद दिघे यांच्या प्रतिमेला वंदन करून त्यांच्या प्रतिमेस रंग लावला .
राज ठाकरेंनी आपल्या परिवारासह धुलिवंदन साजरे करत रंग खेळले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या.
जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या साथीने रंगांची मुक्त उधळण करत धुळवडीचा सण साजरा केला.