सरकारनामा ब्यूरो
प्रियांका भलावी यांनी 2020 मध्ये 23 वा क्रमांक मिळवत (MPPSC) मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाची राज्य सेवा परीक्षा उत्तीर्ण केली.
कठोर परिश्रमाच्या जोरावर त्यांनी परीक्षेत यश मिळवले आणि उपजिल्हाधिकारी बनून आईचे स्वप्न पूर्ण केले.
प्रियांका या मूळच्या मध्य प्रदेशातील बैतूल गंजच्या आहेत.
गंज येथील सरकारी शाळेतून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले, आणि जेएच कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बीएस.सी आणि फिजिक्समध्ये एमएस.सी केली.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची सरकारी योजनेत निवड झाली आणि दिल्लीला जाण्याची संधी मिळाली.
MPPSC (Madhya Pradesh Public Service Commission) मुख्य परीक्षेला बसण्यासाठी इंदूरला गेल्या होत्या.
आईची नेहमीच इच्छा होती की, त्यांनी अधिकारी व्हावे आणि तयारीदरम्यान त्यांना तितकी साथही दिली.
चौथ्या प्रयत्नात प्रियांका यांनी 23 वी रँक मिळवत परीक्षेत यश मिळवले.
लहानपणापासूनच प्रियांका यांना अधिकारी व्हायचे होते म्हणून त्या रोज किमान 8 ते 10 तास अभ्यास करत असत.