Vijaykumar Dudhale
नरसय्या आडम यांचा जन्म १ जून १९४५ मध्ये सोलापूरच्या पूर्व भागातील एका कामगार कुटुंबात झाला. त्यांची आई लक्ष्मीबाई विडी कामगार, तर वडील नारायणराव आडम हे गिरणी कामगार होते. त्यांचे शिक्षण इयत्ता नववीपर्यंत झाले.
घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती, त्यामुळे सुरुवातीच्या काळात एका शाळेत शिक्षकाची नोकरी केली. तेव्हापासून नरसय्या आडम यांना मास्तर ही उपाधी मिळाली.
नरसय्या आडम हे १९६२ पासून कामगार चळवळीत सक्रीय आहेत.
नरसय्या आडम हे १९६६ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य झाले आणि त्यानंतर त्यांच्या राजकीय इनिंगला सुरुवात झाली. ते भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य होते. तसेच, महाराष्ट्र राज्याचे पक्षाचे सचिव राहिले आहेत.
विधानसभेच्या १९६७ च्या निवडणुकीत काँग्रेस विरोधी पक्षांनी हिंदु महासभेचे वि. रा. पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे आडम यांनी त्यावेळी त्यांच्या वडिलांसोबत पाटील यांचा प्रचार केला होता.
नरसय्या आडम यांनी १९६८ मध्ये सोलापूर महानगरपालिकेची पहिली निवडणूक लढवली. मात्र, तिला स्थगिती मिळाली. पुढे १९६९ नंतरची महापलिकेची निवडणूक लढवली. नरसय्या आडम हे तीन वेळा सोलापूर महानगरपालिकेत निवडून आले. तसेच, तीनवेळा विधानसभेत निवडून आले. त्यांना उत्कृष्ट विधानसभापटू हा पुरस्कार मिळाला आहे.
नरसय्या आडम मास्तर हे पहिल्यांदा १९७८ मध्ये आमदार झाले. आपल्याला आयुष्यभर घर मिळाले नाही. मात्र, विडी कामगारांना तरी घर मिळवून द्यावं, असं वचन आडम यांच्या आईने त्यांच्याकडून घेतले होते. त्यातून त्यांनी आशिया खंडातील सर्वांत मोठी कामगार वसाहत कुंभारीत उभी केली.
शरद पवार यांच्या विरोधात भूमिका घेण्यासाठी वसंतदादा पाटील यांनी दिलेली ऑफर आडम मास्तर यांनी नाकारली. तसेच, पवारांनी दिलेले मंत्रिपदही घेण्यास आडम मास्तर यांनी नम्रपणे नकार दर्शविला होता.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त 'ड्रीम गर्ल'चा खास परफॉर्मन्स ; 'हे' सेलिब्रिटी राहणार उपस्थित