Deepak Kulkarni
काही महिला आयपीएस आणि आयएएस अधिकारी या त्यांच्या हुशारी आणि स्मार्टनेससाठी ओळखल्या जातात. त्यात आयएएस अधिकारी प्रियंका गोयलचाही समावेश होतो.
प्रियंका गोयलने सहाव्या प्रयत्नात UPSC ची परीक्षा उत्तीर्ण केली.
प्रियंका 369 ची रँक मिळवत 2023 मध्ये IAS अधिकारी झाली.
प्रियंका सोशल मीडियावर चांगलीच फेमस आहे. तिथे खासगी तसेच व्यावसायिक आयुष्यातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
IAS अधिकारी असलेल्या प्रियंकाचा जन्म दिल्लीमध्ये झाला आहे.
दिल्ली विद्यापीठातून बी.कॉमची पदवी घेतल्यानंतर UPSC परीक्षेची तयारी सुरू केली होती.
प्रियंकाचे इन्स्टाग्रामवर एखाद्या सेलिब्रेटीसारखे म्हणजेच तब्बल 184K फॉलोअर्स आहेत.
कितीही खडतर आव्हाने आली तरी हार न मानता आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेत राहायचे. हेच प्रियंकाने आपल्या सहा वर्षांच्या स्ट्रगलमधून सिध्द केलंं आहे.