Rashmi Mane
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सेंट्रल विस्टा प्रकल्पातील कर्तव्य भवनाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. हे भवन इंडिया गेट आणि राष्ट्रपती भवनाच्या दरम्यान वसलेलं आहे.
कर्तव्य भवन हे आता केंद्र सरकारच्या सर्व प्रमुख मंत्रालयांचं मुख्यालय ठरणार आहे. ही इमारत आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.
कर्तव्य भवनात मोठ्या प्रमाणावर वर्क स्पेस विकसित करण्यात आलं असून, कर्मचाऱ्यांसाठी सुविधा-संपन्न परिसर निर्माण करण्यात आला आहे.
कर्तव्य भवन पूर्ण झाल्यानंतर नॉर्थ ब्लॉक व साउथ ब्लॉक रिकामं करून संग्रहालय उभारण्यात येणार आहे.
गृह मंत्रालय
विदेश मंत्रालय
ग्रामीण विकास मंत्रालय
MSME मंत्रालय
कार्मिक व प्रशिक्षण कार्य मंत्रालय
पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय
प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालय
या नव्या इमारतींमुळे मंत्रालये एकाच ठिकाणी काम करणार असून, अधिक सुसूत्रता आणि जलद निर्णयक्षमता साधता येणार आहे.
कर्तव्य भवन हे आधुनिक भारताच्या प्रशासनिक प्रगतीचं प्रतिक ठरणार आहे. एकत्रित प्रशासन, आधुनिक रचना आणि ऐतिहासिक वारसा, यांचा सुंदर संगम येथे पाहायला मिळणार आहे.