Rashmi Mane
यूपीची आयएएस अधिकारी बनली बिहारची सून, युपीएससी टॉपर अनन्या सिंह यांच्या विवाहाचे काही खास फोटोज्..!
त्यांच्या लग्नाचे फोटोज् सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
UPSC परीक्षा उत्तीर्ण करून दोघेही IAS अधिकारी बनले. त्यांचा संघर्ष आणि समर्पण आजही प्रेरणादायी आहे.
UPSC नंतर दोघांनी एकमेकांचा हात आयुष्यभरासाठी धरला. स्वप्नांसाठी एकमेकांची साथ दिली.
अनन्या सिंह या उत्तर प्रदेशच्या प्रयागराजच्या रहिवासी आहेत. त्या देशातील सर्वात तरुण IAS अधिकाऱ्यांपैकी एक आहेत.
अनन्याने वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी 2019 मध्ये पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.
अनुराग कुमार हे बिहारचे सुपुत्र. त्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. तेही सध्या यशस्वी IAS अधिकारी आहेत.
काम करत असताना अनुराग आणि अनन्याची ओळख झाली. ही ओळख हळूहळू प्रेमात बदलली आणि दोघांनी लग्न केलं.